भाजपवाले कधी वाल्या करतात कधी वाल्मिकी करतात – उद्धव ठाकरे

भाजपवाले कधी वाल्या करतात कधी वाल्मिकी करतात – उद्धव ठाकरे

भाजप वाटेल तेव्हा वाल्या, वाटेल तेव्हा वाल्मिकी करतील, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी लगावला. भाजप कोणाला ही कधीही घेऊ शकतात. झोटिंग अहवाल पारदर्शी असावा, सगळ्यांसमोर अहवाल येऊ द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे.  माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करणा-या झोटिंग आयोगाने आपला गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे सूपुर्द केला आहे. या अहवालात खडसे यांच्याविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे खडसे यांचा मंत्रिमंडळात परतण्याची शक्यता  आहे.

 

 

 

 

COMMENTS