थेट सरपंच निवडण्याला शिवसेनेचाही विरोध

थेट सरपंच निवडण्याला शिवसेनेचाही विरोध

थेट सरपंच निवडण्याला शिवसेनेचाही विरोध दर्शवला आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचाची थेट जनतेमधून निवड करण्याबाबत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. 

सरपंच लोकांमधून निवडला जात असेल तर मग मुख्यमंत्र्यांना लोकांमधून का निवडू नये असा सवाल लोक विचारतील, ग्रामसभा सदस्य वेगळ्या पक्षाचे आणि सरपंच वेगळ्या पक्षाचा असला तर गावाच्या विकासकामात अडचणी निर्माण होतील. कॅबिनेटमध्ये निर्णय झाला असला तरी या निर्णयांसाठी काही अवधी द्यायला हवी. पुढे चोथा व्हायच्या आत निर्णयाचा पुनर्रविचार करावा. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS