पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, वाचा अजित दादा स्टाईल भाषणातील प्रमुख मुद्दे !

पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, वाचा अजित दादा स्टाईल भाषणातील प्रमुख मुद्दे !

 

राष्ट्रवादी काँग्रेचा आढावा मेळावा आज पुण्यात पार पडला. या मेळाव्याला अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रीया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह पक्षाचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या मेळ्याव्यात अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे……

 

पक्षाचा प्रवक्ता माझ्यासारखा सटकू नको –

पक्षाचा प्रवक्ता हा शांतपणे बाजु मांडणारा असावा, ज्याची सटकत नाही असा असावा. अजित पवारांची सटकते त्यामुळे माझ्यासारख अजिबात नसावा या शब्दात त्यांनी प्रवक्ता कसा असावा यावर भाष्य केले. त्यामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकला.

बोलताना शब्द जपून वापरला पाहिजे, नाहीतर काय होतं मला माहित आहे, मी होतो म्हणून उभा राहिलो, अन्यथा संपलो असतो असंही ते म्हणाले.

 

पदाधिका-यांना कानपिचक्या

पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी काम करत नाहीत. फक्त लेटरहेड काढणे तसेच लग्नपत्रिकेत नाव छापने म्हणजे काम नाही अशा शब्दात त्यांनी कामचुकार पदाधिका-यांवर हल्लाबोल केला. अशा पदाधिकर्याना बाजूला केलं जाईल. कोणी सोडून गेला तर त्याची जागा लगेच भरा, कुणाच्या जाण्यानं पक्ष संघटनेचं काम थांबत नाही असा इशारा त्यांनी पक्षातल्या असंतुष्टांना दिला.

 

विद्यार्थी नेता कसा असावा ?

पदाधिकर्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. विद्यार्थी आघाडीसाठी आक्रमक तरूण पाहिजे आहेत. पण तो विद्यार्थी आघाडीसाठी शोभला पाहिजे, नाहीतर त्याचा मुलगा शाळेत जाणारा आणि हा विद्यार्थी नेता असं नको सांगत तरुण विद्यार्थी नेता असावा असंही अजित पवार म्हणाले.

 

ज्यांना पक्षात परताचंय त्यांनी गपगुमान परतावं….

ज्यांना स्वगृही परतायचय, त्यांनी अर्ज करावा, विचार करून निर्णय घेऊ. त्यांना मान सन्मान देऊन पक्षात घेतलं जाणार नाही. त्यांना पायघड्या पसरल्या जाणार नाहीत.  त्यांनी तसं काही केलेले नाही , साधेपणानं त्यांचा प्रवेश होईल.

COMMENTS