आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांना धक्का, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुलगी पराभूत

आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांना धक्का, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मुलगी पराभूत

वाडा – वाडा नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून या नगरपंचायतीत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना चांगलाच धक्का बसला आहे. विष्णू सावरा यांची मुलगी निशा सावरा या पराभूत झाल्या आहेत. तर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गितांजली कोलेकर विजयी झाल्या आहेत. गितांजली कोलेकर यांना 3119 मतं मिळाली आहेत तर निशा सावरांना 2 हजार 677 मतं मिळाली आहेत.

या निवडणुकीत विष्णू सावरांना रोखण्यात शिवसेनेला यश आलं असून शिवसेना 6, भाजप 6, काँग्रेस २, तर राष्ट्रवादी 1 असे पक्षीय आघाडी बलाबल असून याठिकाणी एकाही अपक्ष उमेदवाराला यश आलं नाही.

COMMENTS