हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा गड आला पण सिंह गेला, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभाव

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा गड आला पण सिंह गेला, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभाव

हिमाचल प्रदेश – हिमाचल प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा काँग्रेसच्या हातून आपला गड काबीज केला असल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडीवर आहे. परंतु भाजपचा जरी गड आला असला तरी सिंह मात्र गेला अशीच काहीशी अवस्था झाली आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धूमल हे पराभूत झाले आहेत.

प्रेमकुमार धुमल हे सुजानपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे ते मुख्यमंत्रीपाचे उमेदवार होते. यापूर्वी दोन वेळा प्रेमकुमार धूमल यांनी मुख्यमंत्रीपद भूषविलं आहे. सध्या ते विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेवर होते. भाजपच्या या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचा पराभव झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपला गड मिळाला आहे परंतु सिंह मात्र गेला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS