विधान परिषद निवडणूक,  राणेंचे सर्व विरोधक एकत्र येणार ?

विधान परिषद निवडणूक,  राणेंचे सर्व विरोधक एकत्र येणार ?

नारायण राणे यांनी राजीनामा दिलेल्या विधान परिषदेच्या जागेवर येत्या 7 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. नारायण राणे हेच एनडीएचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. असं झालं तर सध्याच्या स्थितीत ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तसंच नारायण राणे यांचे सर्व विरोधक त्यांच्याविरोधात एकत्र येण्याची शक्यता आहे.

       सध्याचे पक्षीय बलाबलल पाहता राणे यांच्या पारड्यात भाजपची 122 आणि इतर पक्ष आणि अपक्ष अशी 20 अशी एकूण 144 मते पडण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या  एकूण मतांची बेरीच 146 होत आहे. सध्याच्या स्थितीत शिवसेना त्यांचा उमेदवार देण्याची शक्यता नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या उमेदवाराला शिवेसेना पाठिंबा देऊ शकते. शिवसेनला राणे कोणत्याही स्थितीत आमदार म्हणून नको आहेत. त्यामुळे शिवसेना राणेंचा पाडण्याचा अटोकाट प्रयत्न करेल यात शंका नाही.

            काँग्रेस हायकमांडवर आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका करुन राणे पक्षाच्या बाहेर पडले आहेत. त्यामुळे राणे हे काँग्रेसचे एक नंबरचे शत्रू आहेत. काँग्रेसपक्षही राणेंचा पराभव करण्यासाठी जोर लावणार यामध्ये शंका नाही. मात्र नितेश राणे यांचं मत राणेंना पडेल तसंच कालिदास कोळंबकरांचं मतही राणेंना पडण्याची शक्यता आहे.

             राहता राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा. गेल्या 15 दिवसातील राष्ट्रवादीची भूमिका पाहिली तर ते भाजप सरकार विरोधात अधिकच आक्रमक झालेले पाहिला मिळत आहेत.  परवा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नये असे फर्मान काढले. तर शरद पवारही सध्या काँग्रसेचे गुणगान गात आहेत. भाजपच्या विरोधात वातावरण तयार होत असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसही भाजपला मदत करण्याची शक्यता कमीच आहे.

      त्यानंतर भाजपमध्येही राणेंना विरोध करणारा एक गट आहे. तोही त्यांना कितपत मदत करेल याबाबत शंका वर्तविली जात आहे. एकनाथ खडसे यांच्यासाऱख्या नेत्यांने राणे यांच्यावर उघडपणे टीका केली होती. तसंच इतर आणि अपक्ष असेलेल्या 20 आमदारांपैकी सर्वच आमदार बदलती हवा पाहून राणेंना मदत करतील का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राणे रिंगणात उडी घेतलीच तर त्यांची  आमदारचीकीची वाट सोपी नाही एवढ मात्र नक्की !

COMMENTS