‘आभाळ कोसळलं का?’ या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यला चित्रा वाघ यांचे उत्तर !

‘आभाळ कोसळलं का?’ या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यला चित्रा वाघ यांचे उत्तर !

मुंबई – रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, पाऊस पडला की खड्डे पडतात, असं  वादग्रस्त वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याप्रकरणी आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘होय चंद्रकांत पाटील आभाळचं कोसळलयं संतोष शिंदे, बिल्होरे यांच्यावर परिवारावर, बळी घेतलायं तुम्ही ते ही तुमच्या निष्क्रियतेमुळे. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

दरम्यान, 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती.  रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असे चंद्रकात पाटलांनी म्हटले होते.

COMMENTS