नगर लोकसभा जागेचा मार्ग मोकळा, सुजय विखे राष्ट्रवादीतून लढवणार निवडणूक ?

नगर लोकसभा जागेचा मार्ग मोकळा, सुजय विखे राष्ट्रवादीतून लढवणार निवडणूक ?

पुणे –  नगर दक्षिण लोकसभा जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष पहायला मिळत आहे. परंतु या जागेसाठी तोडगा काढण्यात आला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुजय विखे पाटील निवडणूक लढतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या जागेवरुन गेली काही दिवसांपासून आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. ही परंपरेने राष्ट्रवादीच्या वाट्याला येते परंतु या जागेवरुन राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे. त्यामुळे आता सुजय विखे हे राष्ट्रवादीत प्रवेश करुन लोकसभेची जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS