राजू शेट्टी आघाडीत जाणार, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून एवढ्या जागा मान्य ?

राजू शेट्टी आघाडीत जाणार, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून एवढ्या जागा मान्य ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसोबत  स्वाभिमानी शेतकरी संघटना जाणार असल्याची माहिती आहे. आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरु असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आता दोन जागांवर राजी केलं जाण्याची शक्यता आहे. खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले मतदारसंघ, तर वर्धा, सांगली, बुलडाणा यापैकी एक जागा दिली जाणार असल्याची माहिती आहे. परंतु दोन जागांवर राजू शेट्टी समाधान मानणार का हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यामुळे नऊ ते दहा जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर  लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती होती. हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, वर्धा, बुलडाणा, शिर्डी, परभणी आणि औरंगाबादमध्ये उमेदवार देणार असंल्याचंही बोललं जात होतं. पण आघाडीत दोन जागां देणार असुन याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राजू शेट्टी दोन जागांवर समाधान मानणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS