पुण्याजवळील नव्या विमानतळाचा मार्ग मोकळा !

पुण्याजवळील नव्या विमानतळाचा मार्ग मोकळा !

पुणे – पुण्याजवळील पुरंदर विमानतळ (प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज विमानतळ) चा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. संरक्षण विभागानं या विमानतळाला हिरवा कंदील दाखवला असून याबाबत संरक्षण विभागानं पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. त्यामुळे लवकरच या विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

या विमानतळासाठी संरक्षण विभागानं आक्षेप घेतला होता. संरक्षण विभागाच्या आक्षेपामुळे जमीन अधिग्रहणासह अनेक कामे रखडली होती.  परंतु परवानगीमधील महत्त्वाचा अडथळा आता दूर झाला असून संरक्षण विभागानं मुख्यमंत्री कार्यालयाला या विमानतळाच्या परवानगीविषयी पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये संरक्षण विभागानं विमानळाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे पुण्याजवळील पुरंदरमध्ये आता लवकरच विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS