प्रतिभा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद मी हिसकावून घेतलं – शरद पवार

प्रतिभा पाटील यांचं मुख्यमंत्रीपद मी हिसकावून घेतलं – शरद पवार

पुणे – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या राजकीय कारकिर्दिला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिभा पाटील यांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेणा-या ‘भारताची प्रतिभा’ या जीवन गौरव ग्रंथाचे प्रकाशनही राष्ट्रष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रतिभा पाटील यांच्याविषयीच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला. आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीला मी प्रतिभा पाटील यांच्यामागे होतो. मात्र नंतर काळ बदलला आणि मी मुख्यमंत्री झालो आणि प्रतिभाताई विरोधी पक्षनेत्या झाल्या. खरंतर त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर प्रतिभाताईंचा अधिकार होता. मात्र आपण ते पद त्यांच्याकडून हिसकावून घेतले अशी आठवण पवार यांनी यावेळी सांगितली. त्यावर प्रतिभाताई पाटील यांनी पवारांनी माझं मुख्यमंत्रीपद तर घेतलं पण त्यांनी मला तुरुंगातही टाकलं अशा शब्दात ती आठवण पुढे नेली.

शरद पवार यांनी एक घरगुती आठवणही प्रतिभाताई पाटील यांची सांगितली. घरी गेल्यानंतर प्रतिभाताई पाटील कोणालाही जेवणकेल्याशिवाय जाऊ देत नाहीत असं सांगितलं. पुण्यात राहत असतानाही त्यांच्यात बदल झाला नाही असा पुणेकरांना चिमटा काढत त्यांनी आठवण सांगितली. जळगवा आणि अमरावतीची परंपरा प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यातही सुरूच ठेवली यांचीही आठवण पवार यांनी करुन दिली. विरोधी पक्षनेता असताना पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी आपण पवारांवर सडकून टीका केली. मात्र दोघांच्या संबंधात कधी कटुता आली नाही असंही प्रतिभा पाटील म्हणाल्या. पवार देशाचे प्रतंप्रधान झाले नसले तरी त्यांच्या नेतृत्वात देशाला वैभव त्यांनी मिळवून दिले असंही प्रतिभा पाटील म्हणाल्या.

COMMENTS