आणखी एका शिवसैनिकाची हत्या !

आणखी एका शिवसैनिकाची हत्या !

मुंबई – राज्यात शिवसैनिकांवर होणारे हल्ले सुरुच असल्याचं दिसून येत आहे. रविवारी शिवसेनेचे कांदिवली येथील शाखा क्रमांक 39 चे उपशाखाप्रमूख सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन नेत्यांची हत्या झाली, तर त्यानंतर भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा ही धक्कादायक घटना घडली असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान रविवारी रात्री आठच्या सुमारास सावंत हे त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना त्यांना भाऊ म्हणून दोघा ईसमांनी हाक मारली. सावंत यांनी आपली दुचाकी थांबवली असता काही सांगण्याच्या बहाण्याने एका ईसमानं त्यांच्या जवळ येऊन छातीत गोळी घातली आणि पसार झाला. त्यानंतर सावंत यांना तात्काळ शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु आठ वाजून 40 मिनीटांनी सावंत यांना मृत घोषीत करण्यात आलं. कांदिवलीच्या आकुर्ली रोड, गोकुळ नगर येथे हा हल्ला करण्यात आला असून 2009 साली देखील सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS