नाशिक – मनसेच्या नगरसेविकेचे निधन !

नाशिक – मनसेच्या नगरसेविकेचे निधन !

नाशिक – मनसेच्या नगरसेविका सुरेखा रमेश भोसले यांचं आज पहाटे निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर नाशिकमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. भोसले यांच्या निधनामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोसले यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. नाशिकच्या रविवार कारंजा या भागातून सलग दुस-यांदा सुरेखा भोसले निवडूण आल्या होत्या. कालच पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका चंचला कोद्रे यांचे ह्दयविराकाराच्या झटक्याने अवघ्या 42 व्या वर्षी निधन झालं.

COMMENTS