मुंबई महापालिका पो़टनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर यांचा विजय

मुंबई महापालिका पो़टनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर यांचा विजय

कांदिवली – कांदिवलीतील पश्चिम प्रभाग क्रमांक 21 मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतिभा गिरकर यांचा विजय झाला आहे.प्रतिभा गिरकर यांचा ७ हजार १२२ मतांनी विजय झाला आहे.

तत्कालीन नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्याच सुनबाई प्रतिभा गिरकर यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलं होतं. या पोटनिवडणुकीत सेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यामुळे प्रतिभा गिरकर यांना घवघवीत यश मिळालं आहे.

तर या निवणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे श्रीम. निलम मधाळे उभं करण्यात आलं होतं. मधाळे यांनी या निवडणुकीत १९८४ मतांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत एकूण मतदान ११ हजार ८०४ झालं असून एकूण २८.७५ टक्के मतदान झालं आहे. तसेच या निवडणूकीसाठी ६ हजार ६३१  पुरुष व ०५ हजार  १७३ स्त्रिया‍‍ असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावला.

 

COMMENTS