आता गुगलद्वारे होणार मतदाराची ओळख!

आता गुगलद्वारे होणार मतदाराची ओळख!

नवी दिल्ली – तुमच्याकडे मतदार ओळखपत्र  नसेल किंवा हरवली असेल, तरीही तुम्हला आता मतदान करता येणार आहे. दिल्ली निवडणूक आयोग मतदारांना गुगलशी लिंक करण्याचे काम करत आहे.  गुगलमध्ये त्यांचे नाव आणि अॅड्रेस हे सर्वकाही नोंदवलेले असेल.  

याची सुरुवात प्रथमच दिल्लीमधून झाली आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून दिल्लीतील 5 विधानसभा मतदारसंघ पटपडगंज, रोहिणी, बादली, मटियामहल आणि मालवीय नगरमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे. 30 नव्हेंबरपर्यंत हे सुरू करण्याचे टार्गेट आहे.

मतदाराचे नाव आणि संपूर्ण पत्ता, पोस्ट ऑफिस, घराजवळील लँडमार्गद्वारे गुगलशी अटॅच केले जाईल. त्यात मतदाराचे घर, अक्षांश आणि रेखांश अंतर यांचीही नोंद असेल. पाच विधानसभा मतदारसंघांनंतर दिल्लीमध्ये इतर ठिकाणी याची सुरुवात केली जाणार आहे. अशी माहिती उपविभागीत दंडाधिकारी संदीप दत्ता यांनी सांगितले आहे.
तुम्हाला घरातील एखाद्या सदस्याचे नाव मतदार यादीत नेंदवायचे असेल तर निवडणूक कार्यालयात जाण्याचीही गरज पडणार नाही. बीएलओ (बूथ लेवल ऑफिसर) तुमच्या घीर येईल आणि तुमच्या कुटुंबीयांचे नाव मतदार यादीत जोडेल. ही प्रक्रियाही देशात प्रथमच सुरू केली जाणार आहे.

 

COMMENTS