देशभरातील शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार

देशभरातील शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार

नवी दिल्ली – आज दिल्लीत शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सरकारचे शेतकरी धोरण यासाठी देशातील सुमारे 180 शेतकरी संघटना एकत्र आल्या असून रामलीला मैदानावरून मोर्चास प्रारंभ झाला आहे.

सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्षे झाले. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ असे म्हटले होते. भाव तर दिला नाही, पण नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले. पण शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आहे.

या मोर्चात मेधा पाटकर,  विविध राज्यातील शेतकरी नेते, महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीं सहभाग घेतला आहे.

COMMENTS