चिक्की घोटोळ्यातील कंत्राटदारालाच सॅनिटरी नॅपकीनचं कंत्राट, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल !

चिक्की घोटोळ्यातील कंत्राटदारालाच सॅनिटरी नॅपकीनचं कंत्राट, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल !

नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे. या अंतिम आठवड्याचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र केलं आहे.  राज्य सरकारकडून भ्रष्टाचा-यांना थारा दिला जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ग्रामविकास खात्याअंतर्गत सॅनिटरी नॅपकिनसाठी निविदा अटी दोन वेळा शिथील करत पुन्हा चिक्की घोटाळ्यात आरोप असलेल्या वैद्य इंडस्ट्रीज कंपनीला कंत्राट दिलं असल्याचा जोरदार हल्ला त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे.

तसेच यावेळी बोलत असताना त्यांनी राज्यातील कायदासुव्यवस्थेबाबतही सरकावर जोरदार टीा केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून मुख्यमंत्र्यांच्या नागपूरपासून ते मुंबई, पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या गुन्हे घडत आहेत. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार देशपातळीवर गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्याची टक्केवारी 21. 1 % आहे. सायबर क्राईम, मालमत्ता गुन्हे, अपहरणाच्याबाबतीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. तसेच राज्यात खून प्रकरणं तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महिला आणि बालक अपहरणामध्ये नागपूर देशात कोची नंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे हे राज्य कायद्याचे की काय द्यायचे आहे? असा प्रश्न पडत असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटलं.

तसेच जर आम्ही खोटे बोलत असू, भ्रष्ट्राचारबाबत केलेले आरोप खोटे असतील तर आमच्यावर गुन्हे दाखल करा, भर चौकात फाशी द्या असंही त्यावेळी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. क्लीनचीट म्हणजे निर्दोष नाही तर स्वच्छ फसवणूक असा आहे, जे राज्याच्या जनतेची करत आहेत. मुख्यमंत्री यांनी राज्याला सर्वात जास्त भ्रष्टाचारयुक्त राज्य केलं असल्याची टीकाही धनंजय मुंडे यांनी केली आहे. अख्ख राज्य सरकार, आमदार नागपुरात असतांना अधिवेशनाच्या सुरुवातीला खंडणी वसुलीसाठी हत्या होते. ही एक प्रकारे अधिवेशनाला दिलेली सलामी होती. कोण आहे हा मुन्ना यादव?  नागपूरात यादवी माजली आहे का असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

मला गावाकडे एकजण म्हणाले पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार खासदार जास्त दिवस टिकत नाहीत अशी खिल्ल्हीही त्यावेळी धनंजय मुंडेंनी  आता 3 वर्षे झाली आहेत. आता मागे काय झाले हे बोलू नका. तुम्ही 3 वर्षात काय केले याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा. निवडणूक आणि सोशल मिडियाकडे जेवढे लक्ष देत आहात तेवढे लक्ष कायदा सुव्यवस्थे कडे दिले गेले पाहिजे अशी मागणीही त्यावेळी धनंजय मुंडे यांनी केली.

 

COMMENTS