गुजरातमध्ये काठावर पास झालात, पुढे काय होते ते बघा? –अजित पवार

गुजरातमध्ये काठावर पास झालात, पुढे काय होते ते बघा? –अजित पवार

नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडताना विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतक-यांच्या विषयावर बोलत असताना या सरकारला शेतक-यांची किंमत राहिली नसून पोलीस शेतकर्‍यांच्या पायावर गोळी मारू शकत होते, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष करतात. काय मागत होते शेतकरी! ऊसाला भाव मागत होते त्यामुळे तुम्ही गोळी मारण्याची भाषा करता याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, गुजरातमध्ये काठावर पास झालात पुढे काय होते ते बघा असा इशाराच त्यावेळी अजित पवार यांनी दिला आहे

दरम्यान राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून मुख्यमंत्र्यांच्या नागपूरपासून ते मुंबई, पुण्यासारख्या शहरात महिलांची सुरक्षा वा-यावर असल्याची टीका त्यावेळी अजित पवार यांनी केली आहे. मुंबईत महिलांवरील हल्ले वाढले असून रेल्वेमध्ये प्रवास सुरक्षित राहिला  नाही आणि सरकार सांगते आम्ही उपाययोजना करतोय. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार एवढे दुर्लक्ष का करते आहे असा सवालही अजित पवार यांनी सभागृहात केला.

मुख्यमंत्र्यांचे नागपूर शहर गुन्हेगारीत देशात कोचीनंतर दुसरे शहर झालं आहे. मुख्यमंत्री हे मान्य करायला तयार नाहीत.  नागपूरात व्यापाऱ्याला जाळून मारले जात आहे. अधिवेशन काळात एवढे संरक्षण असताना खून पडतात, मुन्ना यादवला नागपूर पोलीस अटक करू शकत नसतील तर मुंबई पोलीस अटक करतील असे पोलीस महासंचालक नागपूरात येऊन सांगतात. मुन्ना यादव फरार आहे आणि पोलीस पकडू शकत नाहीत, या गुंडाला सरकारने राज्यमंत्री की मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत. तसेच आपल्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगारीला खतपाणी घातले जाते आहे का?  असा सवालही त्यावेळी अजित पवार यांनी केला.

COMMENTS