काँग्रेसनं जागा वाढवल्या, वंचित बहूजन आघाडीला ‘एवढ्या’ जागांची ऑफर?

काँग्रेसनं जागा वाढवल्या, वंचित बहूजन आघाडीला ‘एवढ्या’ जागांची ऑफर?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. कारण विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे सोबत आले तर त्यांना जागा वाढवून देण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काँग्रेस नेत्यांनी वंचितला येत्या विधानसभेत 96 जागा देऊ केल्या असल्याची माहिती आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांच्या मुंबईतील निवासस्थानी एक बैठक पार पडली.
या बैठकीला काँग्रेसकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे गेले असल्याची माहिती आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी वंचितला येत्या विधानसभेत 96 जागा देऊ केल्याची माहिती आहे. मात्र वंचितला हे मान्य नसल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांपैकी वंचितला 96 जागा देऊन काँग्रेस 96 आणि राष्ट्रवादी 96 जागांवर निवडणूक लढवेल, असा फॉर्म्युला या नेत्यांनी आंबेडकरांसमोर ठेवल्याची माहिती आहे.

परंतू वंचितला ज्या 96 जागा देऊ केल्या आहेत त्या तिसरी आघाडी म्हणून दिल्या जातील, अशी काँग्रेसची भूमिका असून त्यात वंचितला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतर मित्र पक्षाच्या उमेदवारांनाही सामावून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना हे मान्य नसून त्यांनी वंचितसाठी पूर्ण 96 जागांची मागणी केली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या मित्र पक्षांना आपापल्या 96 जागांमध्ये सामावून घ्यावे’, अशी त्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र निवडणूक लढवणार, की आघाडीसोबत जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

COMMENTS