भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे ‘या’ मतदारसंघात काँग्रेस आमदाराच्या विजयाची हॅटट्रिक होणार?

भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे ‘या’ मतदारसंघात काँग्रेस आमदाराच्या विजयाची हॅटट्रिक होणार?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. या मुलाखतीदरम्यान अनेक नेते इच्छुकांच्या रांगेत असल्याचं पहायला मिळाले आहे. परंतु सर्वच नेत्यांना उमेदवारी देण शक्य नसल्यामुळे पक्षातील अनेक नेते नाराज होणार आहेत. त्यामुळे याचा अंतर्गत फटका पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

भाजपलाही विदर्भातील चिखली या विधानसभा मतदारसंघात तिसय्रांदा फटका बसू शकतो अशी चर्चा आहे. याठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपचे अनेक नेते रांगेत आहेत.मागील निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर राहिलेले भाजपचे सुरेश खबुतरे, संजय चेके पाटील, अ‍ॅड.विजय कोठारी,  पालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळविणारे नगराध्यक्ष पती कुणाल बोंद्रे,  श्वेता महाले इच्छुक आहेत. त्याचबरोबर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही याठिकाणी चाचपणी सुरु केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपला अंतर्गत फटका बसू शकतो असं बोललं जात आहे.

दरम्यान भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी 2009 आणि 2014 निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. यंदाही चिखली विधानसभेत भाजपच्या गटात उमेदवारांची मोठी यादी असल्यामुळे भाजपला आमदार राहुल बोंद्रे यांच्या विजयाची हॅटट्रिक होणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

COMMENTS