आशिष देशमुख यांच्यासह आणखी एका भाजप नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का !

आशिष देशमुख यांच्यासह आणखी एका भाजप नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का !

नवी दिल्ली – भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच आशिष देशमुख यांच्याबरोबर भाजपच्या आणखी एका नेत्यांन काँग्रेसमध्ये आजे प्रवेश केला आहे. भाजपचे संस्थापक जसवंतसिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे मानवेंद्र सिंह हे एकटे नसून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी चित्रा सिंह आणि भाऊ भुपेंद्र सिंह हे देखील कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी भाजपला दोन मोठे धक्के बसले असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानवेंद्र सिंह यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. आज अखेर त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपाचे आमदार असलेल्या मानवेंद्र सिंह यांनी बारमेरमध्ये झालेल्यास्वाभीमान रॅली‘दरम्यान आपण भाजपा सोडणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान त्यांनी भाजपच्या धोरणावर सडकून टीक केली असून कमल का फूल बडी भूल असं त्यांनी म्हटलं आहे.

मानवेंद्र सिंह हे विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर २०१३ मध्ये बारमेर मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांच्यात राजकीय वाद रंगला होता. त्यावर नाराजी व्यक्त करत मानवेंद्र सिंह यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

तसेच मानवेंद्र सिंह हे पश्चिम राजस्थानमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला याठिकाणी मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु  पश्‍चिम राजस्थानमध्ये पार्टीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

दरम्यान आजच्या दिवशीच  भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी देखील भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देशमुख यांनी काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.या दोन्ही नेत्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

COMMENTS