आशिष देशमुख यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश !

आशिष देशमुख यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश !

नवी दिल्ली – भाजपाचे विदर्भातील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी काँग्रेस मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करण्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीलाच आशिष देशमुख यांनी ई-मेलच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या जाहीरसभेत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आशिष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नक्की मानला जात होता. आज त्यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या काँग्रेसमधील आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS