शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर !

शशिकला यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मंजूर !

बेंगलुरु –  भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या नेत्या व्ही. के. शशिकला यांची पॅरोलवर सुटका झाली आहे. बंगळुरू येथील तुरुंगात चार वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या व्ही. के. शशिकला यांनी पती एम. नटराजन हे आजारी असून त्यांना भेटण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात यावा, अशी विनंती केली होती.

शशिकला यांचे पती नटराजन हे यकृताच्या आजाराने ग्रस्त असून चेन्नईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती टी. टी. व्ही. दिनकरन यांनी दिली. शशिकला यांना पॅरोल मंजूर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली असून ती मान्य करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पॅरोल रजा मिळाली आहे.

 

COMMENTS