नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ एनडीएत सामील !

नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ एनडीएत सामील !

सिंधुदुर्ग – “महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणार आहे,” अशी घोषणा नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गमधील पत्रकार परिषद राणे बोलत होते.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी दसरा उलटताच 1 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या स्थापनेदरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी पक्षाची नेंदणी अधिकृतपणे झाल्यानंतर एनडीएच्या सहभागाविषयीची घोषणा केली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी त्यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाल्याने नारायण राणेंना आता कॅबिनेट मंत्रिमंडळात कोणते स्थान मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS