राज ठाकरेंकडून लता मंगेशकरांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

राज ठाकरेंकडून लता मंगेशकरांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

मुंबई : भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. या निमित्त्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून लता दीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस, अशा शब्दात राज ठाकरेंनी अभीष्टचिंतन केले आहे.

गेल्या साठ दशकांपासूव लतादीदी आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर, 1929 रोजी मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात शीख मोहल्ल्यात झाला. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकात बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. सिनेसंगीतात केलेल्या अजोड कामगिरीबद्दल त्यांना ‘गानकोकिळा’ हा किताब दिला गेला आहे. 1974 ते 1991 या काळात सर्वात अधिक गाणी गाण्याचा त्यांच्या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. त्यांनी वीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये 980 पेक्षा अधिक चित्रपटगीतं गायली आहेत. त्यांना भारत सरकारने 2001 साली सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्‍न’ देऊन गौरव केला आहे.

 

COMMENTS