मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण 3 ऑक्टोबरपासून

मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण 3 ऑक्टोबरपासून

मुंबई – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यात 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम  3 ऑक्टोबर 2017 ते 5 जानेवारी 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी  दिली.

कार्यक्रमानुसार मतदार याद्यांची  3 ऑक्टोबर 2017 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी करण्यापूर्वी तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यातील त्रुटी व उणीवांचा शोध घेण्याचे काम केले जाणार आहे. तसेच मतदार यादीमधील मयत आणि दुबार मतदारांची नावे शोधून ही नावे कमी करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार  3 ऑक्टोबर 2017 रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती 3 ऑक्टोबर ते ते  3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधीत भाग,सेक्शनच्या ग्रामसभा, स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम दि. 7 ऑक्टोबर आणि  13 ऑक्टोबर 2017 रोजी केले जाईल. रविवार दि. 8 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत  5 डिसेंबर 2017 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यवतीकरण आदी ‍20 डिसेंबर 2017 पर्यंत केले जाईल आणि दिनांक 5 जानेवारी 2018 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने 18 ते 21 वयोगटातील तरुण व पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  1 जानेवारी  2017 ची मूळ मतदार यादी तसेच पुरवणी याद्यांचे विलनीकरण व एकत्रीकरण करुन प्रारुप मतदार यादी 3 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान केंद्रावर तसेच मध्यवर्ती मतदान केंद्रात (सीपीएस) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दि. 8 ऑक्टोबर व दि.22 ऑक्टोबर 2017 या दोन सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए)  यांची नियुक्ती करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सायकल रॅली,पथनाटये अशा कार्यक्रमांचेही आयोजन करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणी, वगळणी,पत्त्यामधील दुरुस्ती आदींसाठीचे विहीत नमुने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित बीएलओ स्तरावर करता येईल शिवायhttp://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवर योग्य त्या पुराव्यांसह ऑनलाईनरित्या अर्ज करता येईल.

 

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी

28 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत

मुंबई शहरामध्ये शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला असून दि. 28 सप्टेंबर 2017 ते 6 नोव्हेंबर 2017 या कालावधीत या मतदार संघासाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या मतदार संघांसाठी पूर्णता नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. पदवीधर मतदारसंघामध्ये नांव नोंदणी करण्यासाठीचा नमुना-18 व शिक्षक मतदारसंघामध्ये नाव नोंदणी करण्यासाठी नमुना-19 मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध ठेवण्यात आले आहेत.

मुंबई व कोकण विभागातील पदवीधर व मुंबई विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक- 28 सप्टेंबर 2017, या अधिनियमाच्या कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची पुनर्प्रसिद्धी- 13 ऑक्टोबर,कलम 31 (4) नुसार वर्तमानपत्रातील जाहीर नोटीसीची द्वितीय पुन:प्रसिद्धी- 25 ऑक्टोबर 2017, नमुना 19, नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- दि. 20 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची छपाई- 21 नोव्हेंबर 2017,दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2017, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- दिनांक 15 जानेवारी 2018 आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे.

COMMENTS