तामिळनाडूमध्ये नवी राजकीय समिकऱणे, चेन्नईत आज केजरीवाल – कमल हसन भेट ?

तामिळनाडूमध्ये नवी राजकीय समिकऱणे, चेन्नईत आज केजरीवाल – कमल हसन भेट ?

चेन्नई – दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडूमध्ये नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उद्या  चेन्नईत कमल हसन यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. कमल हसन यांच्याकडून याभेटीबाबत अधिकृत दुजारो मिळाला नसला तरी दोन्ही नेते भेटणार असल्याचं समतंय.

             कमल हसन यांच्या पक्ष स्थापनेच्या संकेतानंतर या भेटीला महत्व आलं आहे. कदाचित अरविंद केजरीवाल हे कमल हसन यांना आम आदमी पार्टीत येण्याचं निमंत्रण देऊ शकतात असंही बोललं जातंय. आम आदमी पार्टीमध्ये कमल हसन यांना घेऊन संपूर्ण राज्याची जबाबदारी हसन यांच्यावर दिली जाऊ शकते असंही बोललं जातंय. मात्र हसन यांच्याकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो यावरच पुढील घडामोडी अवलंबून आहेत.

        काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते माकपमध्ये जातील असंही बोललं जातं होतं. मात्र त्याचा त्यांनी इन्कार केला होता. त्यानंतर काही काळ ते भाजपमध्ये जातील असंही बोललं जातं होतं. मात्र त्याचाही त्यांनी अप्रत्यक्षपणे इन्कार केला होता. थोडक्यात आपण कट्टर डावे होऊ शकत नाही आणि कट्टर उजवेही होऊ शकत नाही असे संकेत कमल हसन यांनी दिले होते. त्यामुळे नवा पक्ष काढण्याचा संकेत त्यांनी दिले आहेत. आता केजरीवाल यांची ऑफर के कितपत स्विकारतात ते पहावं लागेल. ऑफर नाही स्विकारली तरी नव्या पक्षासोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव केजरीवाल यांच्याकडून ठेवला जाऊ शकतो.

             तामिळनाडूमध्ये सध्या अण्णा द्रमुकंचं सरकार असलं तरी ते किती काळ टिकेल याचा भरोसा नाही. जयललितांच्या निधानंतर अण्णा द्रमुकची तीन शकले झाली आहेत. त्यापैकी दोन जणांनी एकत्र येऊन सध्या सत्ता स्थापन केली आहे. ते कितीकाळ एकत्र राहतील याबाबत साशंकता आहे. राज्यातील या अस्थिरतेचा फायदा घेऊन या महिन्याच्या शेवटी नवा राजकीय पर्याय देऊन राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नजीब आजमावण्याचा हसन यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

COMMENTS