जेट एअरवेज  अखेर ताळ्यावर, राजू शेट्टींची मागितली माफी

जेट एअरवेज  अखेर ताळ्यावर, राजू शेट्टींची मागितली माफी

आज सकाळी खासदार राजु शेट्टी यांची काहीही चूक नसताना त्यांना मनस्ताप देणारं जेट एअरवेज अखेर ताळ्यावर आलं आहे. व्यवस्थापनानं राजू शेट्टी यांची माफी मागितली आहे. तसंच त्यांच्याकडून घेतलेले 2 हजार रुपये परत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळी राजू शेट्टी यांनी बोर्डिंग पास घेतलेले असतांना त्यांना घेऊन जाण्यास जेट एयरवेज विसरले. मुंबई विमानतळ येथे आज सकाळी सहाच्या विमानाचे दिल्ली येथे जाण्यासाठी बिझनेस क्लासचे टिकिट घेतले व तास भर आधी विमानतळ वर पोहोचले, रितसर बोर्डिंग पास घेतले व वेळ होता म्हणून लॉन्ज मधे बसले त्यावेळी रजिस्टर मध्ये नोंद देखील त्यांनी केली. राजू शेट्टी कधीही प्रोटोकॉल घेत नाही तसेच मदतनिस देखील घेत नाही. काही वेळाने ते बोर्डिंग करता लॉन्ज बाहेर आले असता बोर्डिंग द्वार बंद झाल्याचे त्यांना कळविन्यात आले. बोर्डिंग पास घेतलेले असता असे विसरून जाने हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले असता जेट एयरवेजने सरळ हात वर केले. मात्र दिल्ली मीटिंग करता जाने जरूरी असल्याने पर्यायी व्यवस्था करण्यास शेट्टी यांनी  विनंती केली. त्यांना सात वाजताच्या विमानाचे बदली तिकीट दिले. मात्र या करता त्यांचा कडून 2000 रुपये जास्तीचे वसुल करण्यात आले. चूक नसल्याने या बाबत पैसे भरन्यास  शेट्टी यांनी नकार दिला असता जेट एयरवेज ऐकून घेण्याच्या मनस्थिति मधे नव्हते शेवटी शेट्टींनी कार्ड द्वारे 2000 रुपये पेमेंट दिले. मात्र त्याची पावती मागितली असता एयरवेज कंपनीद्वारे पावती सुद्धा दिली नसल्याने राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जेट एअरवेजच्या बेजबाबदार पणाचा फटका खासदार राजू शेट्टी यांना बसला. वरून त्यांना 2000 रूपये दंड आकारुन पुढील विमानाचे तिकीट दिले. याबद्दल एविएशन मिनिस्टरकडे तक्रार करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर अखेर जेट एअरवेजला जागा आली आणि झाल्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रशासनाने प्रय़त्न केला.

COMMENTS