एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार 23 जूनला होणार जाहीर

एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार 23 जूनला होणार जाहीर

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ अल्पावधीतच संपत आहे. त्यामुळे पूढील 13 वा राष्ट्रपती कोण असेल याबाबत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती ठरविण्यासाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षातील युपीए यांच्यात जोरदार हालचाली सुरू आहेत.

सत्ताधारी आणि विरोधक यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केले नाही. मात्र, सत्ताधारी एनडीएला अखेर मुहूर्त सापडला असून 23 जून रोजी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.

13 व्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरूवात झाली असून  भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासंदर्भात चर्चा झाली. अद्याप एनडीएतर्फे उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. 23 जूनला एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.

 

COMMENTS