जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान !

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान !

मुंबई – वर्धा व उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 11 पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदानाला सुरुवात झाली आहे.  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी होणार असून हमदापूर (ता. सेलू, जि. वर्धा) आणि आनाळा (ता. परंडा, जि. उस्मानाबाद) या जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.

 या पंचायत समित्यांमध्ये पोटनिवडणूक

पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग)

नगाव (ता. जि. धुळे)

तुर्काबाद (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद)

संवदगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)

सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड)

मारतळा (ता. लोहा, जि. नांदेड)

काटी (ता, तुळजापूर, जि. उस्मानाबाद)

सौंदड (ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया)

आजंती (ता. हिंगणघाट, जि. वर्धा)

घुग्घुस-2 (ता. जि. चंद्रपूर)

मानापूर (ता. आरमोरी, जि. गडचिरोली)

COMMENTS