उद्या बहूमत सिध्द करुन दाखवणार –येडियुरप्पा

उद्या बहूमत सिध्द करुन दाखवणार –येडियुरप्पा

मुंबई – कर्नाटकचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना उद्या चार वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करुन दाखवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू असा दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याचे पालन करुन मुख्य सचिवांशी चर्चा करुन उद्याच विधानसभेचे सत्र बोलवू यादरम्यान उद्या आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करुन दाखवू याची १०० टक्के खात्री असल्याचा आत्मविश्वास येडियुरप्पा दाखवला आहे.

दरम्यान राज्यपालांच्या निर्णयाची वैधता तपासण्याऐवजी कोणलाही अतिरिक्त वेळ न देता शनिवारीच विधानसभेत बहुमत चाचणी घेता येईल, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. परंतु सर्वप्रथम बहुमत सिद्ध कोणी करायचे. काँग्रेस- जेडीएस युतीने की भाजपाने असा सवाल काँग्रेसची बाजू मांडणारे अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. ज्याला कोणाला संधी मिळेल त्याने बहुमत सिद्ध करावे. शेवटी बहुमत चाचणीत विधानसभेचा कौल महत्त्वाच असतो असं न्यायमुर्तींनी म्हटलं आहे. तसेच येडियुरप्पा सरकारने बहुमत चाचणीपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. यावर भाजपाची बाजू मांडणाऱ्या रोहतगी यांनी तसे प्रतिज्ञापत्र देण्याची तयारीही दर्शवली आहे.

 

COMMENTS