जगातील पहिला रोबोट नेता; 2020 मध्ये निवडणूक लढविणार !

जगातील पहिला रोबोट नेता; 2020 मध्ये निवडणूक लढविणार !

वेलिंग्टन – रोबोट  आता नेता होणार ऐकून आश्चर्य  वाटल ना पण, न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी जगातील पहिला असा रोबोट विकसित केला आहे, जो नेता बनेल. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या या रोबोट नेत्याने अलीकडेच घर, शिक्षण, व्हिसासंबंधी धोरणे आणि स्थानिक मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी त्याला 2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार करण्याची तयारी सुरू झाली आहे.
या यांत्रिकी नेत्याचे नाव ‘सॅम’ (एसएएम) आहे. न्यूझीलंडचे 49 वर्षीय उद्योगपती निक गॅरिट्सन यांनी तो विकसित केला आहे. ते म्हणाले, ‘सध्या राजकारणात अनेक पूर्वाग्रह आहेत, असे वाटते. जगातील नेते जलवायू परिवर्तन आणि समानता यांसारख्या जटिल मुद्द्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. न्यूझीलंडमध्ये 2020 अखेर सार्वत्रिक निवडणूक होईल. तेव्हा सॅम उमेदवार म्हणून दावा सादर करू शकेल.’ दुसरीकडे ‘टेक इन आशिया’ने अहवालात म्हटले आहे की, प्रणाली भलेही पूर्णपणे अचूक नाही, पण अनेक देशांत वाढते राजकीय आणि सांस्कृतिक अंतर भरण्यासाठी मदतीची ठरू शकेल.

 

अलीकडेच राजकीय उलथापालथीत तीन पक्षांच्या आघाडीतून जेसिंडा अर्देर्न पंतप्रधान झाल्या होत्या. जेसिंडा देशाच्या १५० वर्षांच्या इतिहासात तिसऱ्या महिला आणि सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. त्या फेरनवीनीकरण ऊर्जा आणि किमान वेतन वाढवण्याच्या मुद्द्यावर सत्तेत आल्या आहेत. त्यांच्या पुढाकारानेच ‘सॅम’ला नेता म्हणून तयार केले जात आहे. पंतप्रधान जेसिंडा ‘सॅम’सोबत विचारविनिमयही करत असतात.

 

सॅम चॅटबोट आहे. सध्या त्याला कायदेशीर वैधता मिळाली नाही. तो फेसबुक मेसेंजरद्वारे लोकांना प्रतिक्रिया देणे शिकत आहे. प्रयोग म्हणून या रोबोटवर न्यूझीलंडशी संबंधित योजना, धोरणे आणि तथ्यांशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी लोकांना यादीतून दिलेल्या प्रश्नांच्या पर्यायाची निवड करावी लागते. सॅम त्या प्रश्नांची निश्चित संकल्पना आणि लोकांच्या मतांच्या आधारे उत्तर देत आहे.

 

COMMENTS