पत्रकारांनो सावधान… तर तुमची मान्यताच होईल रद्द !

पत्रकारांनो सावधान… तर तुमची मान्यताच होईल रद्द !

नवी दिल्ली – खोटी बातमी दिली तर यापुढे पत्रकारांना महागात पडणार आहे. कारण खोट्या बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी सरकारनं पावलं उचलली असून पहिली खोटी बातमी दिली तर सहा महिन्यांसाठी मान्यता रद्द, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी मान्यता रद्द होणार, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्यात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

दरम्यान वृत्तपत्रात खोटी बातमी प्रसिद्ध झाल्यास त्यासंबंधी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करता येणार आहे. तर, वृत्तवाहिन्यांवर बोगस बातमी प्रसिद्ध केल्यास त्यासंबंधी एनबीएकडे (नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन) तक्रार करता येणार असून डिजिटल मीडियाबाबत यामध्ये कोणताही उल्लेख नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे खोटी बातमी देणा-या पत्रकारांना चांगलंच महागात पडणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS