देशभरातील 14 मतदारसंघाची मतमोजणी सुरू !

देशभरातील 14 मतदारसंघाची मतमोजणी सुरू !

दिल्ली – लोकसभेच्या चार जांगावरील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. या चारही जागा यापूर्वी भाजपकडे होत्या. त्यामुळे त्या सर्व जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे आहे. महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया आणि पालघर, उत्तर प्रदेशातील कैराना आणि नागालँडमधील एक जागेचा या मध्ये समावेश आहे. गेल्या चार वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे 2014 मध्ये भाजपकडे असलेल्या 282 खासदारांची संख्या 272 वर आली आहे.

विधानसभेच्या 9 जागांवर पोटनिवडणुक झाली आहे. तर कर्नाटकामध्ये एका जागेवर मतदान झालं आहे. त्या दहाही ठिकाणी मतमोजणी सुरू झाली आहे. पोटनिवडणुक झालेल्या 9 जागांमध्ये केरळ, उत्तर प्रदेश, मेघालय, बिहार, पश्चिम बंगला, पंजाब आणि उत्तरराखंड या राज्यातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. तर  झारखंडमधील दोन जागांचा समावेश आहे.

COMMENTS