विनोद तावडेंना प्रतिक्षा भाजप कोअर कमिटी बैठकीच्या निमंत्रणाची

विनोद तावडेंना प्रतिक्षा भाजप कोअर कमिटी बैठकीच्या निमंत्रणाची

मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपने ५ आणि ६ जानेवारी रोजी राज्य कोअर कमिटीची बैठक बोलवली आहे. याबैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विनोद तावडे यांना बोलावण्यात आले नाही. मागील काही महिन्यांपासून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांमधील एक असलेल्या विनोद तावडे यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. तसेच विधानपरिषदेमध्ये त्यांना डावलून अगदीच जुनिअर असलेल्या लोकांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकारिणीमध्ये विनोद तावडे यांना स्थान दिले नाही. तेव्हापासून ते नाराज असल्याचे बोलले जाते. दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांना महासचिव पद देण्यात आले. तसेच हरियाणाचे प्रभारीची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून ते राज्यातील एकाही कार्यक्रमात ते पक्षाच्या कार्यक्रमात उपस्थित नसतात.

विनोद तावडे हे मिडिया वर्तुळात प्रसिध्द नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ते सोशल मिडिया किंवा इतर कोणत्याही प्रकार सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यातही त्यांना राज्य कोअर कमिटीच्या बैठकीत ते उपस्थित राहण्याचे त्यांना निमंत्रण नसणं हे लक्ष वेधून घेणारं आहे.

COMMENTS