काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील देणार राजीनामा?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील देणार राजीनामा?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशानंतर ते राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 12 मार्चला दादरमधील वसंत स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.काँग्रेसने राधाकृष्ण विखे पाटलांना विरोधी पक्षनेतेपदासारखी मोठी जबाबदारी दिलेली असताना त्यांचाच मुलगा भाजपमध्ये जात असल्याने मोठी चर्चा रंगत आहे.

यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे नैतिकतेचा प्रश्न म्हणून आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा विखे पाटील राजीनामा देतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

COMMENTS