नगर लोकसभेबाबत अजित पवारांनी केलेल्या  वक्तव्यावर विखे-पाटलांची प्रतिक्रिया !

नगर लोकसभेबाबत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर विखे-पाटलांची प्रतिक्रिया !

नाशिक – नगरची जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि राष्ट्रवादीचीच राहील, तसेच नगरची जागा सोडल्याचं पवार साहेबांनी कुठेही सांगितलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा नगरचा दावा नवीन नाही.मात्र आम्हाला नगरची जागा मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत.

तसेच सुजय विखे पाटील यांना काँग्रेसकडूनउमेदवारी न मिळाल्यास भाजपमध्ये जाण्याला आक्षेप असण्याचे कारण नसल्याचा इशारा विखे-पाटील यांनी दिला आहे.
राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार संपूर्णतः सुजयला असून राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळेल असंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नगर लोकसभेच्याजागेवरुन काँग्रेस-राष्टेरवादीमध्ये संघर्ष सुरु झाला असल्याचं दिसत आहे. ही जागा काँग्रेसला सोडली नाही तर निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS