विरोधी पक्षनेतेपदी असताना मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांबाबत विखे पाटलांना काय वाटते ?

विरोधी पक्षनेतेपदी असताना मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांबाबत विखे पाटलांना काय वाटते ?

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांबाबत आता विखे पाटील यांना काय वाटतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. याबाबत आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवरील आरोपाचा विषय आता संपला आहे,’ असं म्हणत विखे पाटील यांनी माघार घेतली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी आधी केलेले आरोप निराधार होते का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तसेच विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार प्रवेशकरणार असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशापूर्वी विखे – पाटील यांची मुंबईत काँग्रेस आमदारांसह खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसचे आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर हे नेते विखे पाटलांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोणकोण जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS