मुंबईत भाजपला धक्का, दोन्ही जागांवर पराभव !

मुंबईत भाजपला धक्का, दोन्ही जागांवर पराभव !

मुंबई – विधानपरिषदेच्या मुंबईतील दोन्ही जागांवर भाजपला धक्का बसला असून या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यादा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या 8000 पेक्षा जास्त मतांपैकी 4 हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. तसेच मुंबई पदवीधर मतदारसंघातुन शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबई पदवीधरचा गड राखला आहे.  विलास पोतनीस यांना 19,403 मते मिळाली आहेत. तर भाजपचे अमितकुमार मेहता  यांना 7792 मते मिळाली आहेत.

दरम्यान कोकण पदवीधर निवडणुकीतही भाजपला धक्का बसणार असल्याचं दिसत असून शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे हे 2000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे निरंजन डावखरे दुसऱ्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र या तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी असल्याने याठिकाणी काटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे.

तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे 7924 मतांनी आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत उमेदवार संदीप बेडसे हे दुसऱ्या स्थानावर आहेत. तर भाजपचे अनिकेत पाटील हे पिछाडीवर आहेत.

 

COMMENTS