मुंबई – वर्सोव्यात तिकीटावरुन युतीत घमासान!

मुंबई – वर्सोव्यात तिकीटावरुन युतीत घमासान!

मुंबई – भाजप शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. त्यातून भाजपच्यावतीने काही स्थानिक आमदारांचा पत्ता देखील कट करण्यात आला असून अनेक आमदार चिंतेत आहेत.तर मित्रपक्ष यांच्याकडून देखील जास्त जागेची मागणी करण्यात येत आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष यांना देण्यात आलेल्या जागांवर भाजप चिन्हावर निवडणूक लढवण्यात आली होती. आता मात्र काही मित्रपक्षांनी आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युतीत जागावाटपाचा तिढा वाढत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मुंबईमधील वर्सोवा मतदारसंघ 2014 मधील निवडणुकीत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला सोडण्यात आला होता. त्यावेळी ही निवडणूक भारती लव्हेकर यांनी भाजपच्या चिन्हावर लढवली होती. मात्र हा मतदारसंघ यावेळच्या निवडणुकीत भाजपकडे घेण्यात यावा अशी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. या जागेवर मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज , मुबंई सचिव संजय पांडे, व 2014 साली धारावी मतदारसंघात निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या मुबंई सचिव महिला दिव्या ढोले यांनी आता भाजपकडून दावा केला आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीमुळे याठिकाणी काँग्रेसला फायदा होणार असे बोलले जात आहे.

COMMENTS