वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी रुपेश जाधव, तर उपमहापौरपदी प्रकाश रोड्रिंक्स !

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी रुपेश जाधव, तर उपमहापौरपदी प्रकाश रोड्रिंक्स !

विरार – वसई-विरार महापालिकेच्या विद्यमान महापौर प्रविणा ठाकूर यांचा अडिच वर्षांचा कार्यकाळ संपूष्टात येत आहे. त्यामुळे महापौरपदी रुपेश जाधव तर उपमहापौरपदी प्रकाश रोड्रिंक्स यांच्या नवावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 28 डिसेंबर रोजी महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या पदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे बहूजन विकास आघाडीच अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत नगरसेवकांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रुपेश जाधव आणि प्रकाश रोड्रिंक्स यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे येत्या 28 डिसेंबरनंतर महापौरपदी रुपेश जाधव तर उपमहापौरपदी प्रकाश रोड्रिंक्स हे विराजमान होणार आहेत.2019 च्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन, जातीय समिकरणा नुसार ही निवड झाली असल्याची चर्चा सध्या वसई-विरार महापालिकेत सुरु आहे.

COMMENTS