उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, फुलपूरमध्ये सपच्या उमेदवाराचा विजय !

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, फुलपूरमध्ये सपच्या उमेदवाराचा विजय !

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला असून समाजवादी पार्टीचे उमेदवार नागेंद्र प्रताप सिंग पटेल यांचा 59 हजार 613 मतांनी विजय झाला आहे. तसेच गोरखपूर मतदारसंघातही भाजप पिछाडीवर असून असल्यामुळे त्याठिकाणीही भाजपची हार निश्चित मानली जात आहे. गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. 1998 पासून ते या मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडूण आले आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते मोठ्या फरकाने जिंकले होते. त्यावेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते भाजपला मिळाली होती. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यनंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे तिथे निवडणूक घेण्यात आली. इथ पराभव झाल्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

तिकडे बिहारमध्ये अररिया मतदारसंघात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदावर आघाडीवर आहेत. या मतदारसंघात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र तरीही भाजपचा उमेदवार मोठ्या पिछाडीवर आहे. अररिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार निवडूण आला तर अररिया मतदारसंघ हा पाकिस्तानातील आयएसआयचा गड होईल असं वक्तव्य भाजपच्या बिहार प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं. तसंच लालू प्रसाद यादव हे तरुंगात गेले असतानाही तिथून आरजेडीचा उमेदवार आघाडीवर आहे.

COMMENTS