बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल !

बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकसभा, विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल !

मुंबई – उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फलपूर आणि बिहारमधील अररिया याठिकाणी लोकसभेसाठी तर बिहारमधील जहाँनाबाद आणि भभुआ विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये दोन जागांवर लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याने गोरखपूरची जागा रिक्त झाली असून, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याने फुलपूरची जागा रिक्त झाली होती. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून, काँग्रेस स्वबळावर लढत आहे. गोरखपूरमध्ये १०, तर फुलपूरमध्ये २२ उमेदवार रिंगणात आहेत. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूर मधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे.दरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आज होत असलेल्या मतमोजणीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

COMMENTS