लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवार पिछाडीवर !

लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवार पिछाडीवर !

दिल्ली – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्य यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. गोरखपूरमधून समाजवादी पार्टीचे प्रविणकुमार निषाद हे 11 व्या फेरीनंतर भाजप उमेदवारापेक्षा 11880 मतांनी आघाडीवर आहेत. तर फूलपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीचा उमेदवार 22842 मतांनी आघाडीवर आहे. तर बिहारमधील अररिया या मतदारसंघात नितीशकुमार आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी लालू प्रसाद यांच्या पक्षाचा उमेदवार सुमारे 21 हजार मतांनी आघाडीवर आहे. दोन विधानसभा मतदारसंघापैकी 1 मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. अजून मतदानाच्या अनेक फेरी शिल्लक असल्या तरी हाच ट्रेंड राहिल्यास भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

गोरखपूर मतदारसंघ हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. 1998 पासून ते या मतदारसंघातून सलग 5 वेळा निवडूण आले आहेत. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते मोठ्या फरकाने जिंकले होते. त्यावेळी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते भाजपला मिळाली होती. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यनंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे तिथे निवडणूक घेण्यात आली. इथ पराभव झाल्यास हा भाजपसाठी, योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा धक्का असेल. तर दुसरीकडे फूलपूरमध्ये उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी राजीनामा दिल्यामुळे तिथेही पोटनिवडणूक घेण्यात आली. तिथेही भाजपचा मोठा पराभव होण्याची शक्यता आहे.

तिकडे बिहारमध्ये अररिया मतदारसंघात लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदावर सुमारे 21 हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र तरीही भाजपचा उमेदवार मोठ्या पिछाडीवर आहे. अररिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार निवडूण आला तर अररिया मतदारसंघ हा पाकिस्तानातील आयएसआयचा गड होईल असं वक्तव्य भाजपच्या बिहार प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं. तसंच लालू प्रसाद यादव हे तरुंगात गेले असतानाही तिथून आरजेडीचा उमेदवार आघाडीवर आहे.

COMMENTS