उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी, एसटी संपाचा तिढा सुटणार?

उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी, एसटी संपाचा तिढा सुटणार?

मुंबई – गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून खासगी वाहन चालकांची चंगळ सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपाचा हा तिढा आता सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी यासंदर्भात फोनवरून चर्चा केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS