मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फितूर झाले – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फितूर झाले – उद्धव ठाकरे

मुंबई –  कोकणातील नाणार प्रकल्पाला केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दाखवला आहे. या प्रकल्पाला स्थानिकांसह शिवसेनेनं विरोध केला होता. तरीही केंद्र सरकारनं या प्रकल्पावर स्वाक्षरी करुन नाणारला हिरवा कंदिल दाखवला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री ‘फितूर’ झाले असून ते अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘नाणार’ प्रकल्प लादणार नाही असे त्यांनी सांगितले असतानाही हा प्रकल्प लादला गेला असल्यामुळे शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रकल्प होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तरीही हा प्रकल्प लादला गेला असल्यामुळे हा विश्वासघात असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दास दिल्लीत किंमत नसल्याचं यावरुन दिसत असल्याची जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल

दरम्या बुधवारी केंद्र सरकारनं या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील तसेच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असा दावा करण्यात येत आहे.

परंतु शिवसेनेनं मात्र आपली भूमिका कायम ठेवत या प्रकल्पाला जाहीर विरोध केला असल्याचं यावरुन दिसत आहे.

COMMENTS