…ते बोलत आलोय, तेच करणार : उध्दव ठाकरे

…ते बोलत आलोय, तेच करणार : उध्दव ठाकरे

मुंबई : सध्या औरंगाबाद नामांतरावरून राज्यातील राजकारण तापले असताना आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीनगरवर भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आतावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काॅंग्रेस काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिला आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. त्यावर भाजप आणि मनसेने त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हा महाविकास आघाडीच्या समाना कार्यक्रमाचा भाग नाही. तसेच शहराची नावे बदलून लोकांच्या जीवनात काहीच बदल होत नाही, असे सांगून काॅंग्रेसचा त्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले. तसेच दोन दिवसांपूर्वी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री व काॅंग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या खात्याचा निर्णय अमित देशमुख यांच्या फोटोसह सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आला. यामध्ये औरंगाबादचा संभाजीनंगर असा उल्लेख करण्यात आला. यावर काॅंग्रेसने पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करून माहिती व जनसंपर्क विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

यावर आज दस्तरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार”. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही”.

त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS