नागपूरकरांकडून मुख्यमंत्र्यांचा आवाज बंद

नागपूरकरांकडून मुख्यमंत्र्यांचा आवाज बंद

मुंबई – नागपूरमधील नव्या विधीमंडळाच्या कार्यालयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी नागपूरकरांशी संवाद साधत असताना ठाकरे यांनी हा टोला लगावला. त्यावेळी मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे? असा मिश्किल सवालही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले लगावले.

उध्दव ठाकरे म्हणाले, सध्या देशात माझ्याच हाती सर्व काही असं वातावरण आहे. असं असतानाही महाराष्ट्र मात्र केंद्रीकरणावर भर देत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करत आहे. नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही त्यांनी सांगितले.

नागपुरात आता कार्यालय सुरू झालंय. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे, असं सांगतानाच आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई एक झाली आहे, असं ते म्हणाले.

COMMENTS