“शिवसेनेत नगरसेवक आले त्यामध्ये भ्रष्टाचार मग गुजरातमध्ये पटेल नेते फोडण्यासाठी कोट्यवधी उधळले तो काय गरबा आहे काय ?”

“शिवसेनेत नगरसेवक आले त्यामध्ये भ्रष्टाचार मग गुजरातमध्ये पटेल नेते फोडण्यासाठी कोट्यवधी उधळले तो काय गरबा आहे काय ?”

मुंबई – मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबईतील भाजपच्या काही ईडीबहाद्दर नेत्यांनी या प्रवेशामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. मग गुजरातमध्ये नरेंद्र पेटल यांना 1 कोटी रुपये मोजले त्यातले 10 लाख टोकन दिले तो काय गरबा होता काय ? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनातून केला आहे. गुजरातच्या विकासावर एवढा भरोसा असेल, देशात त्याच्या डांगोरा पीटला आणि सत्ता मिळवली. मग एवढं असताना पैसे देऊन नेते खरेदी करण्याची वेळ का आली आहे ? असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. इकडे शिवसेनेत नगरसेवक आले तर ईडी कडे जाणा-यांनी गुजरातमध्ये जाऊनही ईडीकडे नेते खरेदीची तक्रार करावी असा टोला उद्धव यांनी किरीट सोमय्या यांना नाव न घेता लगावला आहे.

COMMENTS