उदयनराजेंचं मनपरिवर्तन नाहीच, भाजपमध्ये जाण्याचं निश्चित!

उदयनराजेंचं मनपरिवर्तन नाहीच, भाजपमध्ये जाण्याचं निश्चित!

पुणे – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 15 सप्टेंबरला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. यावेळी ते राष्ट्रवादीतच राहणार अशी चर्चा होती. परंतु त्यांची मनधारणी करण्यात राष्ट्रवादीच्या दिग्गज नेते अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपात जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. परंतु दोन दिवसांपासून त्यांनी आपला निर्णय बजलला असल्याचं बोललं जात होतं. याबाबत त्यांनी स्वत: शरद पवार यांचीही भेटी घेतली. या भेटीनंतर ते राष्ट्रवादीच राहतील असं बोललं जात होतं परंतु अखेरीस त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे आता लवकरच उदयनराजे भाजपमध्ये जातील असं दिसत आहे.

COMMENTS